BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी | Marathi Kavita Bhavpurna Shradhanjali In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी दिलेले आहेत.ह्या संपूर्ण विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.त्याकरता आपण त्याना भावपूर्ण श्रद्धांजली चारोळ्या {Bhavpurna Shradhanjali Charolya} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी marathi भावपूर्ण श्रद्धांजली चारोळ्या, marathi kavita bhavpurna shradhanjali banner, भावपूर्ण श्रद्धांजली कविता पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

Marathi भावपूर्ण श्रद्धांजली चारोळ्या

marathi भावपूर्ण श्रद्धांजली चारोळ्या
पवित्र स्मृतींची ज्योत तेवते
अखंड आमच्या मनी
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
marathi kavita bhavpurna shradhanjali in marathi
अश्रृंचे बांध फुटूनी
हृदय येते भरुनी
जाल इतक्या लवकर निघूनी
नव्हते स्वप्नीले कधी कुणी !
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ माया प्रीती देवूनी
सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
bhavpurna shradhanjali marathi kavita
प्रेमळ होतास तु, विसरेल कसे कुणी
मनात येतात दाटूनी,
सदैव तुझ्या आठवणी
आत्म्यास शांती लाभो
हीच प्रभू चरणी विनवणी
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
भावपूर्ण श्रद्धांजली चारोळ्या
हे विधात्या पुरे पुरे रे
दुष्ट खेळ हा सारा
आकाशातून पुन्हा निखळला
एक हासरा तारा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला
आठवण येते प्रत्येक क्षणाला
आजही तुमची वाट पाहतो
यावे पुन्हा जन्माला
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
तो हसरा चेहरा
नाही कोणाला दुःखवले
मनाचा तो भोळेपणा
कधी नाही केला मोठेपणा
उडुनी गेला अचानक प्राण
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आठवीता सहवास आपला
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
असा जन्म लाभावा
देहाचा चंदन व्हावा
गंध संपला तरी
सुगंध दरवळत राहावा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुझा कानी
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

श्रध्दांजली कविता

जी हृदयात राहत होती
ती एकच मूर्ती होती
जी जगण्याची प्रेरणा देत होती
ती एकच मूर्ती होती
ती पवित्र मूर्ती म्हणजे माझे बाबा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
हे देवा तू मला इतकं का रडवलंस
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
क्षणोक्षणी आमच्या मनी
तुमचीच आहे आठवण
हीच आमच्या जीवनातील
अनमोल अशी साठवण
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
परिवार ज्याचे मंदिर होते
प्रेम ज्याची शक्ती होती
परिश्रम ज्याचे कर्तव्य होते
परमार्थ ज्यांची भक्ती होती
तुझ्या दिव्यआत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

Zalgo Text Generator

व्रतवैकल्यांचा भांडार पोथी पुराणाचे सर
साऱ्या कुटुंबाचा आधार अशी माझी आजी
काय सांगू तिच्या हातातली चवदार जादू
चवदार तिची पुरणपोळी चविष्ट तिचे लाडू
अशी माझी आजी
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जन्म मृत्यूचा फैसला
कोणीच करत नाही
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख
काही केल्या पचत नाही
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
जीवन हे एक असे युद्ध आहे
जे प्रत्येक जण शेवटी अर्धच असतो
ह्या दुनिया ला सोडून
देवाकडे कधीतरी जातच असतो
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
साथ सुटली लाखमोलाची छाया आटली वटवृक्षाची
गेला आधार दादांचा हरपले गंध स्नेहाचे
लोपला सागर करुणेचा हास्य लोपले प्रकाशाचे
निघुनी जाण्याने तुमच्या नेत्र होती ओले आमुचे
स्वजनांचे गेले प्रेरणास्थान लोपले दैवत आमुचे
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!

Bhavpurna shradhanjali marathi kavita

अंगणी वसंत फुलला
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला
तुम्ही फिरुनी यावे जन्माला
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल
चालता बोलता देव तुम्हास नेईन
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
ढग येतात पण पाऊस पडत नाही
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू
सांग आई मी तुला कसे विसरू
🙏🏻💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

भावपूर्ण श्रद्धांजली कवितेच्या माध्यमातून कशी द्यावीत ?

श्रद्धांजली कवितेच्या माध्यमातून आपण त्यांच्यासमोरील आदर आणि प्रेम दर्शवू शकता. जर आपण एक श्रद्धांजली कविता लिहायची इच्छा असेल तर खास बातम्या, स्मरणीय अनुभव, आणि त्यांच्यावर कृतज्ञता जसे विषय आपल्या कवितेत अंकित करू शकता. आपण त्यांच्या जीवनातील अनुभव, कार्यक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आदि विषयांवर फोकस करून त्यांच्यावर संदेश देण्याचा प्रयत्न करू शकता. त्यांच्या संगतींच्या विविध पहाटें, जीवनाच्या संघर्ष, अंधश्रद्धेची जाणीव व स्थिरता, त्यांच्या शैक्षणिक संघर्ष आणि यश आदी हे सर्व मुळ विषय आपल्या कवितेत अंकित करू शकता. आपण श्रद्धांजली कविता लिहिण्यापूर्वी त्यांच्या जीवनावर थोडं संशोधन करून त्यांच्या शैलीवर फोकस करून असलेली त्यांची सांगती सुगमपणे देऊ शकता.

भावपूर्ण श्रद्धांजली कविता कशा लिहाव्यात ?

श्रद्धांजली कविता लिहण्यासाठी पहिलं ते ठरवणे आवश्यक आहे कि आपण कोणासमोर त्यांच्या श्रद्धेसाठी कविता लिहीत आहोत. त्यांच्या संबंधानुसार त्यांच्यासमोर आदर आणि प्रेम दर्शविण्यासाठी आपण त्यांच्या जीवनाच्या विविध पहाटें, अनुभव, शैक्षणिक क्षेत्र, आणि कार्यक्षेत्रावर फोकस करून अधिक माहिती आणि अभिव्यक्ती घेऊ शकता. आपल्या कवितेत त्यांच्या जीवनातील घटनांच्या संक्षिप्त वर्णनासह त्यांच्या अंतिम विदायाची श्रद्धांजली देणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनातील उद्दंड विशेषता आणि त्यांच्यासमोर आपल्याने जोडलेल्या स्मरणीय अनुभवांचे उल्लेख आपल्या कवितेत वाढवू शकते. श्रद्धांजली कविता लिहीताना, आपण त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या क्षणांची उल्लेख देऊ शकता.

आम्हाला आशा आहे कि bhavpurna shradhanjali marathi kavita | भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी आई आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून shradhanjali kavita,भावपूर्ण श्रद्धांजली कविता, Shok kavita in Marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेल्या भावपूर्ण श्रद्धांजली कविता चारोळ्या आणि शायरी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:-
200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी