BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

दुःखद निधन संदेश मराठी मित्र | Friend Death Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्र दिलेले आहेत.ह्या संपूर्ण विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते. आपल्या मित्राचे दुःखद निधन होणे हि आपल्या आयुष्यातील एक वाईट गोस्ट असते आपला मित्र आपल्या प्रत्येक सुखदुःखात सामील असतो त्याकरता आपण त्याना प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश मित्र {khup aathvan yete mitra msg in marathi} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे . प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी श्रद्धांजलि भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्रासाठी, भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य मित्र, मित्र को श्रद्धांजलि शायरी पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्र

दुःखद निधन संदेश मराठी मित्र
दोस्तीच्या दुनियेतला
आमचा राजा हरपला
भावा तुझ्या आत्म्यास
चिरशांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा 🙏💐🌼
Friend Death Quotes In Marathi
आम्हा मित्रांना सोडून गेलास
पण तू कायमचा
आमच्या स्मृतित राहिलास
आठवण येती तुझी आजपण
राहवत नाही तुझ्याशिवाय
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्र
सगळे म्हणतात कि
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही
पण हे कोणालाच कसे समजत नाही
की लाख मित्र असले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश मित्र
आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते
नियतीने घात केला
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
मित्र को श्रद्धांजलि
जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजली
भावा निःशब्द केल यार तु
तुझी आठवण सदैव येतच राहील
असा दिवस दाखवशील
अस कधीच नव्हतं वाटलं रे
तूझ्या साठी कधी पण आणि
कुठे पण होतो रे आम्ही पण
आमच्यावर विश्वास नाही ठेवला तु
पण तुझ्या विना माझे पुढील
आयुष्य शून्य आहे इतकंच रे😢
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
कोणाशी वाईट वागला नाहीस
तू होता माणूस भला
आमच्या जीवाला मात्र असा
तू चटका लावून गेला
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
जाण्याची वेळ नव्हती
थांबण्यासाठी खुप होते
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो ?
रडविले तु आम्हाला
देवापुढे खरंच कुणाचं चालेना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुमच्यासारखे लोक इतरांच्या हृदयात
अशी जागा बनवून जातात की
मृत्यूनंतरही ते अमर होऊन जातात तु
मच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आपले लाडके ____ यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
हे देवा तू मला इतकं का रडवलंस
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश मित्र

डोळे भरून येतात तुझा फोटो बघितल्यावर
जीवन असे जगलास की मृत्यूला पण लाज येईल
तुझे आयुष्य छोटे होते पण सुंदर होते
प्रत्येक ठिकाणी सुगंध पसरवून
आमच्या आयुष्यातून निघून गेलास
आठवणीत मात्र कायम राहशील
देव तुझ्या आत्म्यास शांती प्रदान करू 🙏💐
भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ
तु नेहमी आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे जिव लावला
कुणी अडचणी मध्ये असेल तर तुला शक्य
होईल तेवढी मदत तु करायचा
आमच्या सोबत राहुन आमच्या वयाचा
होऊन मजा मस्करी करायचा
कधी चिडला कधी रागावलास
पण कोणतीही गोष्ट मनावर घेतली नाही तु
तुझी कमी नेहमी जाणवत राहील भाऊ
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
माणूस किती किमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते
तो दुसऱ्यांची किती मदत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते
आज अशा मौल्यवान माणूस हरवला
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुझा कानी
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमचं असणं सर्वकाही होतं
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
काळाने घात केला
तुला मला कायमचे दूर केले
तुझी आठवण येत राहील
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
डोंगराच्या मागे गेलेला सूर्य
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण ढंगाच्या पलीकडे गेलेला
आपला माणूस
पुन्हा कधीही दिसत नाही
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
पवित्र स्मृतींची ज्योत तेवते
अखंड आमच्या मनी
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

मित्र को श्रद्धांजलि

आज रडू माझे आवरत नाही
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जखमाही कालांतराने भरतात
पण जीवनात हरवलेला प्रवास
पुन्हा परतून येत नाही
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Cool Text Generator

मृत्यू हा जीवनाचा अंत नाही
एक नव्या जिवनाची सुरुवात आहे
तुम्ही जिथे पण रहा सुखी राहा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जे झाले ते खूप वाईट झाले
यावर विश्वासच बसत नाही
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आज माझा प्रत्येक शब्द
ज्वालाकांड घडविणारा ठरो
हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या
जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
तुझे आयुष्य कमी असेल हे माहित नव्हते
सोडून जाशील असेच अनपेक्षित हे माहीत नव्हते
सुगंध तुझा पसरवून आठवणीत कायम राहशील
ईश्वर तुमच्या दिव्या आत्म्यास शांती प्रदान करो 🙏💐

आपल्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यावीत ?

जर आपण आपल्या मित्राच्या निधनाची बातमी समजून घेतली असेल तर त्यांच्यासाठी श्रद्धांजली देण्याची इच्छा असेल तर आपण त्यांच्या जीवनाच्या महत्वपूर्ण मोमेंट्स व त्यांच्या उपलब्धिंच्या स्मृतींच्या आधारावर त्यांच्या खालील प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो: 1. त्यांचे जीवनाचे स्मरणपुस्तक : आपण त्यांच्या जीवनाचे स्मरणपुस्तकातून स्थानिक व्यक्तीच्या वाचकांना त्यांच्या बारेतील विविध मोमेंट्स वाचू शकता जसे कि त्यांचे बचपन, शैक्षणिक क्षेत्र, उद्योजकता, पालनपोषण आणि मनोरंजन इ. त्यांच्या स्मरणपुस्तकातून आपण त्यांच्या जीवनाच्या तसेच उत्कृष्ट कार्यक्षेत्रातील उपलब्धिंच्या बाबतीत पण वाचू शकता. 2. एक स्मृतिचिन्ह : आपण त्यांच्या नावाचा एक स्मृतिचिन्ह देऊ शकता जो आपल्या मित्राच्या जीवनात विशेष महत्व असलेल्या एक घटनेविषयींचा संदर्भ देते.

आम्हाला आशा आहे कि भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्रासाठी | best friend death quotes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेल्या rip message in marathi for friend , shradhanjali message in marathi for friend , भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा, मित्र को श्रद्धांजलि आणि मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:-
200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी