BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

वडील स्टेटस मराठी | Emotional Quotes On Father In Marathi

वडील चारोळ्या (few lines on father in marathi) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेखात मराठीत सर्वोत्कृष्ट वडील, बाबा, पिता, पप्पा या नात्यावरती वडील स्टेटस मराठी {emotional marathi kavita baba sathi} आणि वडील आठवण {baba quotes in marathi} कविता, शायरी, चारोळी आणि कोट्स पाहायला मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील

या लेखात दिलेल्या आई बाबा स्टेटस {papa quotes in marathi} किंवा आई वडील सुविचार {miss you baba marathi status} ह्या आपल्याला या प्रेमातील गोडवा सांगतात. वडिलांची आठवण status {aai baba quotes in marathi} आपल्याला प्रेम करायचे कसे हे शिकवतात.तर आशा आहे कि आपल्याला हे आई वडील शायरी मराठी जरूर आवडले असतील.

वडील चारोळ्या

emotional quotes on father in marathi
बाबांच्या छायेविना
सर्वकाही वाटे अपूर्ण
कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा
न होई कधी ही पोकळी संपूर्ण
वडील चारोळ्या
जेव्हा बालपणी कोणी विचारायचे
तुला मोठे होऊन काय आहे बनायचे
तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नसायचे
पण आता माझ्याकडे एकच उत्तर आहे
माझ्या बाबांप्रमाणे एक कर्तृत्ववान श्रेष्ठ
असा माणूस बनायचे आहे फक्त्त
mulgi aai baba quotes in marathi
सुचलं तर खूप काही आहे पण
देवाबद्दल लिहायला तेवढी माझी ऐपत नाही
वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
मागेल ती वस्तू हातात मुलांना आणून दिली
रिकामा खिसा असला तरी
लाडक्या लेकीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली
निरोप देताना डोळे त्यांचे पाणावले जरी
वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
वडील स्टेटस मराठी
काय लिहू मी कळत नाही
बाबा या एका व्यक्तीसाठी
असे कसे म्हणू शकते कोणी
कोणीही नसते कुनासाठी
जीवन खर्चले बाबांनी सारे
आपल्या कुटुंबातल्या माणसासाठी
बघितलेच नाही बाबा तुम्हाला
कधी जगताना स्वतःसाठी
father quotes in marathi
जोडे झिजले तरी बाप नवीन घेत नाही
आजारी पडला तरी दवाखान्यात बाप जात नाही
पैसा जोडून ठेवतो पण स्वतःसाठी बाप खर्चत नाही
कपडे किती फाटले तरी बाप नवीन काही आणत नाही
मागेल त्याला नाही कधीच बाप बोलत नाही
मारले कधी तरी बाप प्रेम कमी करत नाही
जिवंत आहे तो पर्यंत बाप आपल्याला कळत नाही
आधार हवा असतो तेव्हा बाप आपल्या जवळ नाही
एका छोट्याशा दुकानात जाऊन त्या माणसाने
फाटक्या छत्रीच्या काड्या दुरुस्त करून घेतल्या
आणि मग तो एका मोठ्या दुकानात शिरला
तिथे मात्र त्या माणसाने मुलींसाठी रंगीबेरंगी रेनकोट खरेदी केला
तो माणूस पैशाने गरीब असेलही कदाचित
पण एक बाबा म्हणून तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस मला वाटला
भयावह दुनियेच्या वाटांवरती
बाप एकटाच चालतो
भविष्य सावरण्या लेकरांचे
बाप हा काट्यांवरती वावरतो
बाबा तुमची साथ जर असेल तर
ताकद आहे माझ्यात संपूर्ण जगाशी लढण्याची
पण साथच नसेल तुमची तर
हिमत होत नाही मुंगीला सुद्धा मारण्याची
काबाडकष्ट करून तो
माती मध्ये स्वतःचा घाम गाळतो
सुगंधी मखमल फुलांनी
तो मुलांचे भविष्य सजवून देतो
D=Demand आपल्या मुलांना हवे ते आणून देणारा
A=Ability क्षमता नसून पण मुलांची स्वप्न पूर्ण करणारा
D=Desire इच्छा ऊर्जा उत्साह निर्माण करणारा
सगळे म्हणती आईची वेडी माया
तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया
माया बाबांची असतात नारळ खरे
राग आला जरी वर आतून प्रेमाचे झरे
कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात
देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात
ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात
हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात
माया बाबांची असते कस्तुरीपरी
दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी
येईल वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी
व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी
बाप
बा - बाहेरची दुनिया समजावून सांगणारा
प - परमेश्वररूपातील एक सामान्य मनुष्य

Father quotes in marathi

लेक जाताना सासरी
काळजापासून तो रडत असतो
सुखी ठेवा माझ्या लेकीला
हात सोडून तो सांगत असतो
तू फक्त एक बाप असतो
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
माझे चिमुकले हात धरून
मला चालायला शिकवले
ते माझे बाबा होते
मी काही छान केल्यावर
जे सर्वांना अभिमानाने सांगतात
ते माझे बाबा असतात
मला उणीव भासू नये
या साठी जे दिवसरात्र घाम गाळतात
ते माझे बाबा असतात
जीवनाच्या वाटेवर चालताना
जे माझ्या चुकताना सावरतात
ते माझे बाबा असतात
माझ्या सुखासाठी
जे आपले सर्वस्व पणाला लावतात
ते माझे बाबा असतात
लेकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
स्वतःचे प्रत्येक स्वप्न तो विसरून गेला
जेव्हा पाहिले मी त्याचे तळहात
बाप माझा माझ्यासाठी देव होऊन गेला
बाबा दणकट बाहू आहेत तुमचे
सांगा कसा बरं खाली पडेन
तुम्हीच माझा आधारवड
शेवटपर्यंत तुम्हाला मी जपेन
बाबा असतात थोडे थोडे
नारळाच्या फळा वानी
बाहेरून कठोर भासे
आतमध्ये थंडगोड पाणी
या पावसाचे महत्व सुद्धा
आता कळत नाही मोराला
तसाच बाबा कळत नाहीत
जिवंत पणी या लेकराला
आपल्या मुलांच्या भविष्यासाठी
प्रत्येक संकटाशी लढायला
तयार असणाऱ्या व्यक्तीला बाप म्हणतात
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुमची साथ लाभली
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते
तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत
परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते
त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते
सुचले तर खूप काही आहे पण
ईश्वराबद्दल लिहायला तेवढी माझी कुवत नाही
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
मागेल ती वस्तू हातात लेकरांना आणून दिली
खिसा रिकामा असला तरी
आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली
निरोप देताना डोळे आपले पाणावले जरी
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
बाबा तुमच्यामुळे मला दुनिया ही कळाली
तुमच्यामुळेच मी आयुष्याची अनेक वळणे पाहिली
बाबा कधीच सोडली नाही तुम्ही माझी साथ
बाबा तुम्हीच आहात माझ्या जीवनाचा आधार
हृदयातून हृदयाशी हृदयापर्यंत
ऐकू येणारे फक्त दोन अक्षर
बाबा तुमच्या मिळकतीचे उलगडेना कोडे
मी तर तुमच्यापुढे पूर्ण निरक्षर
सर्व जाणतात तु आहेस कठोर कणखर
ते तुम्हा वरून पाहतात खरतर
रोजचीच तुमची सततची धडपड
नाही दिसणार कुणाला तुमची रोजचीच मरमर
तुमच्या जगण्याचा प्रवास आहे खडतर
बाबा सांगणार का तुम्ही निरंतर
बाबा तुमच्या हसऱ्या चेहऱ्याचा मंतर
दुर होईल बाबा आपल्यातील हृदयांतर
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरुपी बाबा
सूर्य आणि बाप यांच्यात एकच साम्य आहे
सुर्याची प्रखरता आणि बाबांचा राग
या गोष्टी सहन करायला शिका
या गोष्टींचे महत्व इतकेआहे की
जर या नसतील तर संपूर्ण जीवनात अंधार होईल
सैलभर वाटणारी मिठी
घट्ट काळजाशी बिलगली होती
स्पर्श्याची चाहूल त्यानेही
मिटल्या पापणीने जाणली होती
हुरहूर वाढवणारी भीती
कुशीत शिरताच निवळली होती
भेदरलेली हळवी ती चाहूल
बापाच्या कुशीत विसावली होती

Miss you father quotes in marathi

कोणी म्हणे बाबा माझे आभाळ
कोणी म्हणे बाबा माझा कल्पवृक्ष
तर कोणी म्हणे बाबा माझा Superhero
कोणी म्हणे बाबा माझा आधार
कोणी म्हणे बाबा माझी ताकद
तर कोणी म्हणे बाबा माझा Best Friend
कोणी म्हणे बाबा असे बाप माणूस
कोणी म्हणे बाबा असे जगाचा पोशिंदा
तर कोणी म्हणे बाबा माझा Fighting Warrior
कोणी म्हणे आहेत ते वडील
कोणी म्हणे असे तो जन्मदाता
कोणी म्हणे असे तो माझा पिता
तर कोणी म्हणे बाप माझा King Maker

Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.

मुला-मुलीत भेद न करता
तुम्ही मला वागवले
भूक झोप विसरून स्वतःची
तुम्ही मला वाढवले
लव यू बाबा
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
खरे सांगतो बाबा एकटे मला राहवेना तुमच्याविना
चेहरा तुमचा आता बाबा मला दिसेना
झाली सकाळ तरी डोळे माझे तुम्हाला शोधतात बाबा
संध्याकाळ झाल्यावर तुमच्या येण्याची वाट पाहतात बाबा
हे जग मला नको आहे बाबा
फक्त जवळ माझ्या तुम्ही हवे आहे बाबा
आठवण तुमची प्रत्येक क्षणाला येते मला बाबा
प्रत्येक आठवण तुमची मला रडवून जाते बाबा
खूप माणसे मला येऊन भेटून जातात बाबा
पण तुमच्यासारखी बाळा म्हणून
हाक मारणारा कोणी नाही आता बाबा
खरे सांगतो बाबा एकटे मला राहवेना तुमच्याविना
प्रत्येक वेळी खाली पडल्यावर
जो मला उचलतो तो माझा बाबा
चुका केल्यावर ओरडतो
पण तरीही सावरुन घेतो
तो बाबा असतो
खिसा रिकमा असला जरी
नाही कधी म्हणाले नाही
माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत
मी कुणी पाहिला नाही
बाप या दोन अक्षरात आहे किती गोडवा
जणू मोराने आपला पिसारा फुलावावा
इंद्रधनुष्यात अजून एक रंग वाढवावा
सुखाचे प्रत्येक क्षण तुमच्या सोबत घालवणे
कठोर तुमचे बोलणे पण प्रेमानेच मला गोंजारणे
आठवतय मला बाबा ते तुमच्या हातावरील फोड
पाहून ते मला आता अन्नसुद्धा लागणार नाही गोड
धडपडतोय तुम्ही कसे तुम्ही दिवस रात्र फक्त आमच्यासाठी
रडावेसे वाटते बाबा मला मिठी मारून तुमच्याशी
विसरून स्वप्न स्वतःचे
विसरून सुख स्वतःचे
तो आपल्या कुटुंबासाठी
कष्ट करीत राहिला
तेव्हाच मी माझ्या वडिलांमध्ये
मी माझा देव पाहिला
संध्याकाळच्या जेवणाची
व्यवस्था करते ती आई
संपूर्ण कुटुंबाच्या जेवणाची
व्यवस्था करतो तो बाप
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा
बाबा असतात आपल्या आयुष्यातील एक भक्कम वटवृक्ष
बाबा शिवाय आपले आयुष्य आहे व्यर्थ
बाबा म्हणजे प्रमाचा अथांग असा सागर
डोंगर उचलत कष्ठाचें ते सांभाळतात संपूर्ण घर
बाबांची लेकरांवर असे अफाट अशी माया
आपल्या बाळांसाठी ते आयुष्यभर झिजवतात आपली काया
बाबा म्हणजे बाहेरुन असतात कठोर जणू असे नारळ
प्रत्येक गोष्ट आपल्याशी ते बोलतात मात्र सरळ
बाहेरुन जरी भासले ते खूप कठोर
बाबा तुमच्यासमान कुठलीच व्यक्ती नाही थोर
बाबा असतात आपल्या आयुष्यातही खूप मोठा आधार
तुमच्या विना असते संपूर्ण आयुष्यच निराधार
आपल्या लेकरांच्या नशिबाची भोके
ज्याच्या बनियानवर असतात
तो माणूस आपला बापच असतो
स्वतःच्या स्वप्नांचा विचार न करता
स्वतःच्या सुखाचा विचार न करता
दिवस-रात्र आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणारा
तरीसुद्धा सदा आनंदी आणि उत्साही असणारा माझा बाबा
हे जीवन ज्यांची देणगी
ते म्हणजे माझे वडील
जीवनभर पुरतील इतके
सुखाचे दान म्हणजे माझे वडील
व्यक्त व्हायची नाही शब्दांत
अशी व्यक्तीरेखा म्हणजे माझे वडील
बाबा असतात खरी तेलवात
जळतात कुटुंबासाठी ते क्षणाक्षणाला
करून आपल्या हाडांची काडे
आधार देतात मनामनाला
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
कोणत्याही गोष्टीत अपयशी झाल्यावरही
आपल्यावर सर्वात प्रथम विश्वास ठेवणारी
पहिली व्यक्ती असते आपले बाबा
चांगल्या शाळेमध्ये पोरांना
टाकायची धडपड करतो
डोनेशन साठी उधार आणतो
वेळ पडली तर हातापाया पडतो
तो बाप असतो
आयुष्यातील सर्वात सुखी माणूस तोच
ज्याला वडिलांचे प्रेम मिळाले
कारण कितीही पैसे देऊन हे प्रेम विकत मिळत नाही
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
न बोलता प्रेम करतो
न सांगता आधार देतो
न थकता कष्ट करतो
न दाखवता सहन करतो
तो फक्त माझा बाप असतो

आई बाबा स्टेटस

बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे
कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत
स्वतःची झोप आणि भूक
न विचार करता आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक
आणि प्रसन्न असणारा बाबा
बाबां शिवाय हे संपूर्ण आयुष्य व्यर्थ आहे
या प्रवासात प्रत्येक रस्ता ओसाड पडतो
बाबा तुमचे असणे इतके महत्वाचे आहे की
तुमच्या अस्तित्वाने प्रत्येक प्रश्न सोपा असतो
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे
ती केवळ तुमच्यामुळे आहे
माझ्या जगण्याला अर्थ आहे
तो केवळ तुमच्यामुळे आहे
माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे
माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे
अपयशानंतर यश पदरी पडतेच
तू फक्त खचून जाऊ नकोस
प्रयत्न करीत राहा
असे बोलणारे फक्त बाबाच असतात
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
आयुष्यात जोडीदार म्हणून
कदाचित राजपुत्र सापडेल
पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा
पिता मिळणं कठीणच
किती लज्जास्पद गोष्ट आहे ही
प्रत्येक गोष्टी साठी भांडणारी सगळी भावंडे
जेव्हा आपल्या आई-वडिलांच्या म्हातारपणात
त्यांना सोबत ठेवण्यासाठी कधीच भांडण करत नाहीत
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
डील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते
जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते
जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते
जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते
जेव्हा तुम्ही हरता
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला
शोधूनही मिळणार नाही हे पुण्य
सेवार्थाने व्हावे लागेल तुम्हाला धन्य
कोण आहे तुमच्या विना अन्य
बाबा आपल्या शिवाय माझे जीवन आहे शून्य
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
स्वत: टपरा मोबाईल वापरुन
तुम्हाला स्टायलिश मोबाईल
घेऊन देतो तुमच्या प्रीपेडचे पैसै
स्वत: भरतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी
जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो

वडील म्हणजे काय ?

"वडील" हा मराठी शब्द "पिता" अर्थात अब्बा याचा एक उपसर्ग आहे. अर्थात, आपण इंग्रजीत "Father" हा शब्द वापरू शकता.

आम्हाला आशा आहे कि बाप शायरी मराठी आणि बाप स्टेटस मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आई वडील स्टेटस {baba marathi kavita for father},वडील स्टेटस {miss u papa status in marathi after death} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले वडील शायरी मराठी (quotes on father in marathi), वडील आठवण कविता (marathi kavita for father) आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Similar Keywords- poem on father in marathi,papa shayari marathi,aai vadil quotes in marathi,fathers day quotes in marathi,fathers day wishes in marathi.

Read More:-
मराठी स्टेटस नाती | 60+ Nati Marathi Message
सकारात्मक विचार मराठी |70+ Sakaratmak Vichar
शेतकरी स्टेटस मराठी | 50+ Shetkari Quotes In Marathi
वाईट वेळ स्टेटस | वेळ मराठी स्टेटस |50+ Time Quotes In Marathi
जिद्द स्टेटस मराठी |60+ Ziddi Quotes In Marathi
धोका स्टेटस मराठी |50+ Dhoka Status In Marathi
Marathi Quotes, Suvichar |500+ मराठी सुविचार, स्टेटस
मराठी स्टेटस आयुष्य |50+ Life Quotes In Marathi
टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक |100+ Marathi Tomane Status