BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

निसर्ग कविता मराठी |70+ Nisarg Kavita In Marathi

नमस्कार मित्रांनो जर आपण मराठी कविता निसर्ग, marathi poem on nisarg शोधात असाल तर आपल्याला या पोस्ट मध्ये अनेक सुंदर हिरवा निसर्ग कविता, marathi nisarg kavita मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. ह्या सुंदर nisarg poem in marathi आपण सोसिअल मीडिया वर आणि आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेयर करू शकता तरी आपल्याला हि निसर्गावर कविता पोस्ट कशी वाटली. हे आम्हाला नक्कीच कळवा

बालकवींच्या निसर्ग कविता मराठी

बालकवींच्या निसर्ग कविता मराठी
नभात विजांचे खेळ सारे
झाले आता आमचे पाहून
हाल ते सारे शेतकर्‍याचे
कठोर ढगास झाले सांगून

सारे झाले व्याकूळ फार
बळीराजा अन् धरणीमाता
किती प्रार्थना करू तुझी रे
बरसून घे ना पावसा आता

पाहू नको रे ढगा आडून
पाहतो पावसा तुझी वाट
धाव घे, सारे डुलव शेत
लावू नकोस आमची वाट

तुझ्या येण्याची झाली रे वेळ
नकोच आता उशीर करू
हात जोडून करतो विनवणी
नुकसान कोठे नको रे करू

कवी: बालकवी
निसर्ग कविता
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
मराठी कविता निसर्ग
मधुयामिनी नीललता
हो गगनीं कुसुमयुता
धवलित करि पवनपथा
कौमुदि मधुमंगला-

दिव्य शांति चंद्रकरीं
आंदोलित नील सरी
गिरिगिरिवरि, तरुतरुवरि
पसरी नव भूतिला
निसर्ग कविता kusumagraj
फुलपाखरू !
छान किती दिसते । फुलपाखरू

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

पंख चिमुकले । निळेजांभळे
हालवुनी झुलते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

डोळे बारीक़ । करिती लुक लुक
गोल मनी जनु ते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

मी धरु जाता । येई ना हाता
दुरच ते उड़ते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

कवी: बालकवी

मराठी कविता निसर्ग

एक झाड लांब लांब फांद्या असणारं
दुरूनही जवळ घेऊन येणारं,
एक झाड माळरानात एकटच
चिडीचीप उभं असणार
मायेचं प्रेम कुणा ना कुणासाठी जपणार.

एक झाड कधीही न बोलणार
रोज नव्या उमेदीच बीज पेरणार
एक झाड वादळ वाऱ्याशी तग
धरून धीट राहणार
वाटसरुला शांत स्वप्नात पाहणार.

एक झाड दुसऱ्यासाठी
झिजण्याचा ध्यास देणारं
सृष्टीला नवा श्वास देणारं.

एक झाड अथांग समुद्र
तिराशी उभं असणार
लाटांशी खळखळूण हसणार.

एक झाड बागेत रोपटं
म्हणुन असणारं
चिमुकल्यांसोबत लपंडाव खेळणार.

एक झाड बांदावरून शेताच
राखण करणार
बाळाला शांत झोळीत निजवणार.

एक झाड प्रत्येकाला
हवं हवं असणार
माणसाशी माणुसकी जपणार.

Writer- बालकवी
हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती

गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचला त्या भूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे, गावी गाणी
याहुन ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला चुंबून म्हणे फुलराणीला
“छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती ?
तो रविकर का गोजिरवाणा आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी

आंदोली संध्येच्या बसुनी झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल नभी चमकती ते ग्रहगोल
जादूटोणा त्यांनी केला चैन पडेना फुलराणीला
निजली शेते निजले रान निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणि ही आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा काय जाहले फुलराणीला

या कुंजातुन त्या कुंजातुन इवल्याश्या या दिवट्या लावुन
मध्यरात्रिच्या निवांत समयी खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनि राहिले सगळे रान स्वप्नसंगमी दंग होउन
प्रणयचिंतनी विलीन वृत्ती कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होउनी स्वप्ने पाही मग फुलराणी

कुणी कुणाला आकाशात प्रणयगायने होते गात
हळुच मागुनी आले कोण कुणी कुणा दे चुंबनदान
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति विरहार्ता फुलराणी होती
तो व्योमीच्या प्रेमदेवता वार्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरुन खाली फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खुणवुनी नयनी त्या वदल्या ही अमुची राणी

स्वर्गभूमीचा जुळवित हात नाचनाचतो प्रभात वात
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शांती मंद मंद ये अवनी वरती
वीरू लागले संशयजाल संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्नसंगमी रंगत होती तरीहि अजुनी फुलराणी ती

तेजोमय नव मंडप केला, लख्ख पांढरा दहा दिशाला
जिकडे तिकडे उधळित मोती दिव्य वर्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालुनी हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबि फेटा झकमणारा सुंदर मोठा
आकाशी चंडोल चालला हा वाङनिश्चय करावयाला
हे थाटाचे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे

गाउ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट
वाजवि सनई मारुत राणा कोकिळ घे तानावर ताना
नाचु लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रविकर नवरी ही फुलराणी सुंदर
लग्न लागते सावध सारे सावध पक्षी सावध वारे
दवमय हा अंतपट फिटला भेटे रविकर फुलराणीला
वधूवरांना दिव्य रवांनी कुणी गाइली मंगल गाणी
त्यात कुणीसे गुंफित होते परस्परांचे प्रेम अहा ते
आणिक तेथिल वनदेवीही दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी फुलराणीची गोड कहाणी
गुंतत गुंतत कवि त्या ठायी स्फुर्तीसह विहराया जाई
त्याने तर अभिषेकच केला नवगीतांनी फुलराणीला

कवी: बालकवी

निसर्ग कविता kusumagraj

वाहतो पाण्याचा झरा,वाहतो थंड वारा
पाहून असा नजारा,
आठवतो "समुद्र किनारा"

समुद्राच्या किनारी रुतलेली अखंड वाळू
झोपले त्यावरी कधी,
वाटे जणू आई मायाळू

संध्याकाळाच्या वेळी सूर्य जणू पाण्यात बुडे
संध्याकाळाच्या या दृश्याने,थवा पक्षांचा उडे

दिवसा नंतर रात्र संपूनी
रात्रीनंतर दिवस संपूनी
पाहून असा नजारा
आठवतो "समुद्र किनारा"

कवी: बालकवी

Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.

मन वेडे गुंतले पागोळ्यांत
सुरू झाल्या पाऊस धारा
निरोप घेत उकाड्याचा कसा
वाहतो आहे खुशीत वारा

उल्हास दाटला चोहिकडे
लागले सजू डोंगर रान
नदी वाहते जोमात आता
सारे विसरती जगण्याचं भान

पहात होती धरती वाट
कसा येऊन गेला बिलगून
पाऊस होता उनाड-लबाड
धरतीला पहा गेला सजवून

तपश्चर्या मोठी संपली आज
धरेने घेतले पावसाला बाहूत
नटून थटून सजली धरणी
ऊठून दिसते हिरव्या शालूत

कवी: बालकवी
टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा

कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा

कवी: बालकवी
आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी

झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी

पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे

आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

Writer- पाषाणभेद

marathi poem on nisarg

आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे

येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड

नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया

पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात

Writer- पुरंदरे शशांक
ओसाड रान हे खुपते रुपते आत
भणभणतो वारा उगाच वेडा त्यात

नि:सार वाटते शुष्क शुष्क गवतात
तुटलेले जीवन व्यर्थ खुणावित जात

येताच सरी त्या माळ होत सुस्नात
सळसळते जीवन एकजीवसे संथ

ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्‍यावरी गाणे गाती मस्त मजेत

हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास

Writer- पुरंदरे शशांक
निंब जांब जांभळ शेंदरी । तुळशी बहुतचि झांक मारी ।
जणुं काय ती येई धांवुनि । असेंच वाटे पहा साजणी ।
पुढें पाहिलीं खैरीं झाडें । तशीच मोठी मेंदी वाढे ।
जाइजुई ती फार वाढली । गुंफा मोठी बहुतचि झाली ।
अशा वनीं मीं ऐकिलि मुरली । तिला ऐकुनि वृत्ति निमाली ।
काय कथूं त्या सुस्वर नादा । पुढें पाहिलें रम्य मुकुंदा ।
गोपांनीं तो वेष्टित झाला । गळीं फुलांचा हार शोभला ।
कटिं पीतांबर सुंदर दिसला । गोप खेळती नाना लीला ।
कितिक खेळती आटयापाटया । कितिक खेळती दांडु विटया ।
अशा करिति ते नाना लीला । देवहि भक्ताआधिन झाला ।
वाटतें जावें, तत्कमलमुखा पाहावें ॥
Writer- बालकवीं

निसर्ग कविता संग्रह

अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी
म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा हा तारा
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा
अनंत सारें विश्व, जाहलें अनंतांत या लीन
क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळा सांवळा झरा वाहतो, बेटाबेटांतुन

चार घरांचें गाव चिमुकलें पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

- बालकवी

Similar Keywords- nisarg kavita marathi, निसर्ग कविता हिंदी, short marathi poem on nisarg, निसर्ग चारोळी, nisarg kavita marathi language, marathi kavita nisarg var.

Read More:-
जिद्द स्टेटस मराठी |60+ Ziddi Quotes In Marathi
धोका स्टेटस मराठी |50+ Dhoka Status In Marathi
Marathi Quotes, Suvichar |500+ मराठी सुविचार, स्टेटस
मराठी स्टेटस आयुष्य |50+ Life Quotes In Marathi
टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक |100+ Marathi Tomane Status