नमस्कार मित्रांनो! तुम्ही जर विठू माऊली स्टेटस मराठीत (vitthal quotes in marathi) शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये तुम्हाला सुंदर, भक्तिभावाने भरलेले विठ्ठल-रुक्मिणी कोट्स (vitthal rukmini caption in marathi) तसेच विठ्ठल श्लोक (vitthal rukmini quotes in marathi), vitthal rukmini caption in marathi for instagram वाचायला मिळतील, जे तुमच्या मनाला नक्कीच भावतील. हे कोट्स तुम्ही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकता किंवा आपल्या सोशल मीडिया स्टेटससाठी देखील शेअर करू शकता. तुम्हाला हे विठ्ठल कोट्स कसे वाटले, ते आम्हाला नक्की कळवा, आणि हे भक्तीमय विचार आपल्या मित्रमैत्रिणींना व कुटुंबीयांनाही जरूर शेअर करा. "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल!"
तूझा रे आधार मला ॥ तूच रे पाठिराखा ॥
तूच रे माझ्या पांडुरंगा ॥ चूका माझ्या देवा ॥
घे रे तुझ्या पोटी ॥ तुझे नाम ओठी सदा राहो ॥
राम कृष्ण हरी माऊली ॥
एक एक श्वास
घेई दर्शनाचा ध्यास,
चंदनाचा टिळा माथी
नाम तुझे ओठी…,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
मुख दर्शन व्हावे आता
तु सकळ जनांचा दाता
घे कुशीत या माऊली
तुझ्या चरणी ठेवितो माथा
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
करूनी विठ्ठल नामाचा घोष ॥
भक्तिभावाने जोडुनी कर ॥
नतमस्तक होऊनी चरणी ॥
करितो नमन एकादशीच्या दिवशी ॥
जाऊ देवांचिया गावां,
देव देईल विसांवा…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ
विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात
सोड अहंकार सोड तु संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ॥
सुखासाठी करिसी तळमळ,
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,
मग तू अवघाची सुखरूप होसी,
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी !
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।
ताल वाजे मृदूंग वाजे वाजे हरीचा वीणा ॥
माउली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ॥
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
हरि ओम विठ्ठला
कोणे कोठे दिथेला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
॥ हरि ओम विठ्ठला ॥
सुखासाठी करिसी तळमळ
तरि तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मी दुःख विसरसी
जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला
पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला
जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला
पंढरीचा राजा उभा भक्तराजा
उभारूनि भुजा वाट पाहे
बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
माझे माहेर पंढरी ॥
आहे भिवरेचे तिरी ॥ बाप आणि आई ॥
माझी विठ्ठल रखुमाई ॥ पुंडलिक आहे बंधू ॥
त्याची ख्याती काय सांगू ॥ माझी बहिण चंद्रभागा ॥
करीत असे पापभंगा ॥ एकाजनार्दनी शरण ॥
करी माहेराची आठवण ॥
॥ जय हरी विठ्ठल ॥
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
विट्ठलाची ओढ किती गोड गोड
जोहूनिया कर फूले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ
विट्ठल विट्ठल गजर नामाचा
हरे चिंता व्यथा क्षणाधारत
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विट्ठला डोले मिटून ॥
टाळ वाजे मृदंग वाजेवाजे हरीची वीणा
माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ॥
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवो निया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली ॥
॥पाणी घालतो तुळशीला॥
॥वंदन करतो देवाला॥
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला ॥
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी
मुख दर्शन व्हावे आता,
तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली,
तुझ्या चरणी ठेवतो माथा.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
येई गा तु मायबापा पंढरीच्या राया
तुजविण क्षिण क्षिण झाली काया
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास.
🙏🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
हित ते करावे देवाचे चिंतन
करूनिया मन शुद्ध भावे ॥
ज्या सुखाकारणे देव वेडावला
वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला ॥
इंद्रायणी काठी देवाची
आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ॥
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर
ऐसा विटेवर देव कोठे ॥
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी ॥
टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
गुणा आला ईटेवरी
पीतांबरधारी सुंदर तो
डोळे कानन त्याच्या ठायीं
मन पायीं राहो हें
ज्या सुखाकारणे देव वेडावला
वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला
गुरू माता गुरू पिता
गुरू आमुची कुळदेवता
थोर पडतां साकडे
गुरू रक्षी मागें पुढे
सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम ॥
आणिकाचे काम नाही येथे ॥
घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे,
तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
देव दिसे ठाई ठाई भक्ततीन भक्तापाईसुखालाही आला या हो
आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर
किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला
कंठ हा सोकला आळविता ॥
जाऊ देवांचिया गावां
देव देईल विसांवा ॥
गुरू माता गुरू पिता गुरू आमुची कुळदेवता
थोर पडतां साकडे गुरू रक्षी मागें पुढे ॥
एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास
चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी
नाम गाऊ नाम घेऊ
नाम विठोबासी वाहू
आजि संसार सुफळ झाला गे माये
देखियले पाय विठ्ठोबाचे ॥
सो मज व्हावा तो मन व्हावा
वेळोवेळा व्हावा पांडुरंग ॥
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
माझे माहेर पंढरी
आहे भिवरेच्या तीरी!!
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ॥
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते
कोण बोलविते हरीविण
देखवी दाखवी एक नारायण
तयाचे भजन चुको नका ॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव
ह्रदयी पंढरिराव राहतसे
हित ते करावे देवाचे चिंतन
करूनिया मन शुद्ध भावे
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहतां लोचन सुखावले
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर ह्रदयी माझ्या
आणिक काही इच्छा नाही आता गोड तुझे नाम पाडुंरंगा
ऐसी चंद्रभागा
ऐसा भीमातीर
ऐसा विटेवर देव कोठे ॥
इंद्रायणी काठी देवाची
आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ॥
जर तुमच्याकडे vithu mauli caption in marathi असतील, तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा किंवा पाठवा. आम्ही त्या जरूर पोस्ट करू, जेणेकरून विठ्ठल भक्तांसोबत ते प्रेमाने शेअर करता येतील.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले pandurang quotes in marathi, vitthal rakhumai quotes in marathi, varkari quotes in marathi आणि vitthal quotes in marathi for instagram तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर मग काय वाट पाहता? हे भक्तिभावाने ओतप्रोत कोट्स तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर पाठवा आणि सोशल मिडियावर शेअर करायला विसरू नका!