BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

आजी आणि नातू कविता |100+ Grandmother And Granddaughter Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आजी आणि नातू कविता { aaji quotes in marathi} दिलेले आहेत. आजी आणि नातू हे नाते काही विशेष असते कारण आजी म्हणजे प्रेम काळजी आणि गोड खाऊ यात गेलेले एका नातवंडांचे बालपण असते. आजी म्हणजे घराचा आधार स्वमत असते आपल्या लाडक्या आजीला आपल्या या गोड नात्याबद्दल आपल्या हृदयातील भावना सांगण्यासाठी आपण आजी आणि नात कविता { grandfather quotes in marathi} विचार पाठवू शकता. आजी कविता { grandmother quotes in marathi} वाचून तुमच्या आजीला आनंद होईल.तुम्ही जर माझी आजी निबंध {quotes on grandmother in marathi} लिहीत असाल तर हा लेख तुम्हाला खूप मदत करेल.आजीला आपले प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही आजी कविता मराठी { aaji kavita in marathi} आपल्या स्टेटसला ठेऊ शकता.

आजी आणि नात कविता

आजी आणि नातू कविता
सावलीत मी तुझ्या
हक्काने वाढत गेलो
काळजीने तुझ्या
हळवा होऊन गेलो
नातू म्हणून मी तुझा
मी धन्य धन्य झालो
aaji quotes in marathi
मन हे ओथंबून आले
मनात आजी तुझेच चित्र दिसले 💕
आजी तू कोरून गेली छाप प्रितीची
माया दिलीस तू मला मातृत्वाची 🙏
आजी लाभली प्रेमळ दिलाची
निरंतर सुख असावे आजी तुझ्याच साठी 💞
grandfather quotes in marathi
आजी माझी जशी चंद्रकोर
जगण्याचा तिचा अनुभव थोर 💕
कपाळावर तीच्या आठी
शिकवितात जीवनातील 🙏
आडकाठींच्या गाठीभेठी
तशी धडधाकट आहे माझी आजी 🌠
बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी
आजीच आमचा पाया 💞
आणि आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया
grandmother quotes in marathi
खूप भाग्यवान लोकांना मिळते आईची साथ
परंतु मी इतका भाग्यवान नाही 💕
कारण मी आईपासून कधीच दुरावलो आहे
पण माझे भाग्य आहे की 🙏
मला आईची माया देणारी आजी मिळाली
आजी आणि नात कविता
आजी होतीच माझी
माझी दुसरी आई
प्रेमळ त्या विठुची
विठुची रखुमाई
घर माझे फलॅटमध्ये
म्हणायला उंबरा
दारापुढे जागा थोडी
तिथे जोड्यांचा पसारा
जिथे तिथे इमारती
उंचावलय जीवन
मार्ग आहे प्रगतीचा
आहे सहमत पण
मला एक दु:ख आहे
दुरावली झाडवेली
नष्ट होतंय अंगण?
तुळस घरात गेली
दिवाळीत खास माझी
पंचायत होते खरी
जागा कुठे रांगोळीला?
याचं दारं त्याच्या दारी
खुप आठवे आजही
आजोळचं भव्य दारं
पुढे मागे बाग छान
आजीचं घर सुंदर
दारी होतं वृंदावन
आजुबाजूला उंबर
वाटे नेहमी प्रसन्न
दत्त भक्तीचं माहेर
आजी गेली देवाघरी
हरपला तो आनंद
पुन्हा सुनं झालं सारं
नाही उरले अंगण
Writer- Smita Vishal
डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा
आजी तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा
आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर पान
खूप आठवणी गोष्टी संस्काराचा साठा छान
नातवंडांना आवडणारी लाड पुरवणारी
आई-वडिलांचा मार चुकवणारी
कुशीत घेऊन झोपवणारी
कडेवर घेऊन फिरणारी
हळव्या मनाला समजून घेणारी
जुन्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारी
Writer- snehal bagul
घरातल्या एवढ्या खोल्या सोडून
ती जिथे असेल तिथेच वावरायला आवडतं
आजी जिथे असेल तेच घर वाटतं
तिनी बनवलेलं जेवणच सगळ्यात भारी लागतं
गावी गेलेलं असूनही
तिच्याच कुशीत झोपायला आवडतं
आजी जिथे असेल तेच घर वाटतं
किचनमध्ये तिच्या आसपास लुडबुड करायला आवडतं
नवीन काही बनवत असताना
तिला क्रुती वाचून दाखवायला ओट्यावर बसावं लागतं
आजी जिथे असेल तेच घर वाटतं
ती बाहेर कुठे गेल्यावर घर मोकळं-मोकळं वाटतं
मन तिला शोधत भटकत राहतं
तेव्हा कळतं कि आजी आहे म्हणूनच घर घर वाटतं
Writer- Shreeya Dale
आई, तीन वर्षे झाली पण तू सांगितलेल्या गोष्टींचा
ओलावा अजून जाणवतो आहे
जुनाट साड्यांतून साकारलेल्या गोधडीतून
तुझी ऊब अनुभवतो आहे
तुझे थरथरते ओठ आता माझ्या गालावर
प्रेम ओसंडत नाहीत
कोणतंही पुस्तक आणल्यानंतर तुझ्या
आठवणी आल्याखेरीज राहत नाहीत
गावी घर आता सुन वाटतं
ओलावा शोधतो घरभर
अजूनही वाटतं, तू बोटं कितीही दुखले
तरी फोडत असशील शेंगा दिवसभर
आता जाणवतोय आमच्याच
अहंकाराचा हिंदोळा
खरंच आठवतोय तुझा
मायेचा झोपाळा
चाललोय तर आहोत
घेऊन भार भविष्याचा
निर्धार हवा आहे
तुझ्या एकीच्या संचिताचा
Writer- Rohit Shinde

Aaji quotes in marathi

सावलीत मी तुझ्या
हक्काने वाढत गेलो
काळजीने तुझ्या
हळवा होऊन गेलो
नातू म्हणून मी तुझा
मी धन्य धन्य झालो
तुझी ती अनमोल साथ
सदैव राही माझ्या मनात
आजी तू लक्ष्मी वरदा माझी
माझ्या सर्व गोष्टींना तू राजी
तुझे आमच्या प्रितीचे समर्पण
हे आजी अगदी झाले अर्पण
एकटी करुनी गेली तू
न बघता हे दर्पण
Writer- Shashwat Bawankule
आजीची माया असतेच अशी
मनाच्या कुपीत ठेवावी जशी
आजीची माया असतेच अशी
तूप रोटी साखर असावी जशी
आजीची माया असतेच अशी
मुरंब्याची गोडी असावी जशी
Writer- ©तनुजा प्रधान
घरात असते एक म्हातारी, म्हणतात तिला सगळे आजी
जोवर असते आपल्या सोबत, नाही कळत तिची किंमत
चेहरा तिचा सुकलेला, पण हृदयात मात्र प्रेमाचे पाणी
नसते काही इच्छा तिची, फक्त द्यावा तिला थोडावेळ कुणी
Writer- © Yogesh Chitapure
दोन रंगाच्या तिनं शिवलेल्या
गोधडीतील ऊब सांगते,
सोबत आयुष्यभर फक्तं आठवणींचीच
कारण आजी थोडी आयुष्यभर पुरते!
नांदतो सुखाने।।आनंद घरात।।
असतो मजेत।। परिवार।।
खेळती लेकरे।। आजी ती प्रेमळ।।
घर ची देऊळ।। खरोखर।।
आजीची माया असतेच अशी
मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी 💕
आजीची माया असतेच अशी
तूप रोटी साखर खावी जशी 🙏
आजीची माया असतेच अशी
मुरंब्याची गोडी वाढावी जशी 🌠
छान छान गोष्टी म्हणजे आजी
लहानपणीच्या भरपूर आठवणी म्हणजे आजी 💕
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी
रानातली मस्त सैर म्हणजे आजी 🙏
जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी
गोड खाऊचा डब्बा म्हणजे आजी 💞
डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा
आजी मला तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा 💕
आजी म्हणजे माझ्या जीवनातील सुंदर पान
भरपूर आठवणी गोष्टी आणि संस्काराचा अमूल्य साठा छान
नातवंडांना आवडणारी माझे सर्व लाड पुरवणारी 🙏
आई-वडिलांचा मार चुकवणारी
मला कुशीत घेऊन झोपवणारी 💞
मला कडेवर घेऊन फिरणारी
हळव्या मनाला माझ्या समजून घेणारी
जुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवणारी 🌠
माझी लाडकी आजी
प्रिय आजी 💕
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी 🙏
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद 💞
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू 🌠
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे
हेच त्याच्याकडे मागणे ✨
चालते वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल 💕
वाढले असले वय जरी
तरी आजी माझी आहे कमाल 🙏

Make Your Full Screen White Now 💻

अनुभवांनी भरलेले आयुष्य
चालून थकते काही पावले 💕
जवळ जाता ओळखते न पाहता
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी 🙏
तू मला अंगाखांद्यावर खेळवले
तूच मला जीवन जगणे शिकविले 💕
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली 🙏
घरातल्या सर्व खोल्या सोडून
आजी जिथे असेल तिथेच वावरायला मला आवडते 💕
आजी जिथे असेल तेच घर वाटते
आजीने बनवलेले जेवणच सगळ्यात भारी लागते 🙏
गावी गेल्यावर अजूनही
तिच्याच कुशीत झोपायला आवडते
आजी जिथे असेल तेच घर वाटते 💞
किचनमध्ये तिच्या आसपास लुडबुड करायला मला आवडते
नवीन पदार्थ बनवत असताना ✨
आजीला कृती वाचून दाखवायला ओट्यावर बसावे लागते
आजी जिथे असेल तेच घर वाटते 🌠
आजी बाहेर गेल्यावर घर मोकळे मोकळे वाटते
मन आजीला शोधत भटकत राहते
तेव्हा कळते कि आजी आहे म्हणूनच घर घर वाटते ✨
आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर पान
खुप आठवणी गोष्टी संस्काराचा साठा 💕
आजी ही व्यक्ती तशी नातवंडांना आवडणारी
मग ते लाड करण्यासाठी असो किंवा 🙏
आई बाबाचा मार चुकवण्यासाठी
बरंच काही शिकवण्यासाठी 💞
जुन्या काही परंपरा आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी
आजीसारखं माध्यम नाही 🌠
आजी 💕
दाटलेल्या नयनांमध्ये उभी राहते
मूर्ती आजी तुझ्या हसऱ्या मुखाची
अजूनही आठवण येते झोपताना 🙏
मला आजी तुझ्या ऊबदार कुशीची
आजी तू पुन्हा प्रेमाने मला तुझ्या कुशीत घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ?
आजही आठवते मला गोडी 💞
आजी तू केलेल्या पदार्थांची
माझ्या हट्टापायी केलेल्या
आजी तुझ्या हातच्या मासवड्यांची 🌠
आजी तू पुन्हा मला मायेचा घास भरवशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ?
आलो गावी घरी कधी तर ✨
आजी होते जाणीव मला तुझ्या अस्तित्वाची
अलगद भासवून जाते मनी
मला पाहून झालेल्या तुझ्या आनंदाची 🔥
आजी तू पुन्हा मला कुरवाळून मुका माझा घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ? 💫

Grandmother quotes in marathi

आजी सोडून गेली
मन माझे उदास उध्वस्त झाले 💕
काही सांगायचे आज न उरले
सगळ्या गोष्टीत आजी तुझी आठवण येते 🙏
कधी तिला परत भेटेल असे मला झाले
काही सांगायचे आज न उरले
मन उदास माझे झाले 💞
मन उध्वस्त माझे झाले
सगळे सोडून अचानक गेलीस तू आजी
काही सांगायचे आज न उरले 🌠
सावलीत मी तुझ्या
हक्काने वाढत गेलो आजी 💕
काळजीने तुझ्या
हळवा होऊन गेलो आजी 🙏
नातू म्हणून मी तुझा
मी धन्य धन्य झालो आजी
आजी तुझी ती अनमोल साथ 💞
सदैव राही माझ्या मनात
आजी तू लक्ष्मी वरदा माझी
माझ्या सर्व गोष्टींना तू राजी 🌠
आजी तु आमच्या प्रेमाचे समर्पण
हे आजी अगदी झाले अर्पण
एकटी करुनी गेली तू आम्हा न बघता हे दर्पण ✨
घरात असते एक प्रेमळ म्हातारी
म्हणतात तिला सगळे आजी 💕
जोपर्यंत असते आपल्या सोबत
नाही कळत आजीची किंमत 🙏
चेहरा आजीचा आहे सुकलेला
पण तिच्या हृदयात मात्र प्रेमाचे पाणी 🌠
नसते काही इच्छा आजीची
फक्त द्यावा तिला थोडावेळ कुणी 💞
माझी "अशिक्षित" आजी म्हणायची
मेंदूला कुलूप लावून चावी गटारीत फेकलेल्या 💕
"अडाणी लोकांच्या" नादी लागून
त्यांना कधी समजवत नाही बसायचे 🙏
कारण त्यात आपलाच वेळ जातो
पण आता समाजातील so called "प्रतिष्ठित हुशार"
लोकांनीच जुन्या बुरसटलेल्या
किंवा एक विशिष्ट विचार मेंदूत ठेऊन 💞
मेंदूची चावी फेकून दिलेली दिसते
तर त्या "प्रतिष्ठित हुशार" असलेल्या लोकांचे काय करायचे 🌠
हे काय आजीने सांगितलेच नाही बुवा ?
त्याला पाहिले अन् माझी नजर खिळली होती
तुला देखणा नवरा मिळेल असं आजी म्हणली होती 💕
रमताना संसारात घरी जाणे विसरून जाते हल्ली
माहेरी परतायची नाहीस तू असं आजी म्हणली होती 🙏
घरातली काडी पण मर्जीविना माझ्या हलत नाही
सासरी राज्य करशील असं आजी म्हणली होती
दोघांच जगने अन् आनंदाचा संसार करशील 💞
नांदा सौख्यभरे असं आजी म्हणली होती
माझ्याच आयुष्याला दृष्ट लागेल माझी 🌠
नक्की कोणत्या मुहूर्तावर सुखी राहा आजी म्हणली होती
आजीच्या थरथरणाऱ्या हातांची
मऊशार माया 💕
मला वाटते हवीहवीशी
मनात साठवाया 🙏
आजीच्या मांडीवर डोके ठेऊन
आकाशतल्या चांदन्या मोजव्यात
आजीने सांगितलेल्या कथेत 💞
स्वतःचा एक नवीन शोध लागावा
तिचा पदर धरून
मग मागे-मागे फिरावे 🌠
बाबांकडून हट्ट पुरवण्यासाठी
आजीला लाडीगुडी लावावे ✨
आजी तुझ्या हातांची चव
या संपूर्ण जगात कुठेच नाही 💞
आणि तू घास भरवल्याशिवाय
आजी माझी भूक संपत नाही 🌠
तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया
आजी नको सोडूस मला कधी 💕
कारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला
पूर्णत्व येणार नाही 🌟

आपल्या आजीआजोबांना संदेश { caption for aaji in marathi } देण्यासाठी तुम्ही आज्जी ची आठवण { aaji quotes in marathi text } किंवा आजोबा आणि नात कविता { Aaji kavita in marathi } आपण पाठवू शकतो. जर आपण आजीला मिस करत असाल तर आजी कविता मराठी { Short quotes on grandmother in marathi } हे विचार वापरू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे आजी विषयी कविता {quotes for grandmother in marathi} जरूर आवडले असतील.

आम्हाला आशा आहे कि ajoba ani natu marathi quotes आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून aaji ani naat kavita संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले caption for aaji in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

HVAC Certification Complete Guide

Read More:-
200+ Instagram Bio For Boys Stylish (Copy And Paste)
200+ Instagram Bio Ideas For Girls (Copy And Paste)
200+ Attitude Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Attractive Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Short Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Cool Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Cute Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Best Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Classy Instagram Bio (Copy And Paste)
200+ Savage Funny Instagram Bios (Copy And Paste)
200+ Good Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Instagram Vip Bio (Copy And Paste)
200+ Official Bio For Instagram (Copy And Paste)
200+ One Word Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Professional Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Simple Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Single Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Stylish Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Swag Bio For Instagram (Copy And Paste)
200+ Unique Bio For Instagram (Copy And Paste)
100+ Instagram Bio For School Boy (Copy And Paste)
50+ Instagram Bio For Nature Lover (Copy And Paste)